खैरलांजीची धग आजही धगधगत आहे…..

खैरलांजी ( भंडारा )
खैरलांजी हत्याकांड 29 सप्टेंबर 2006 रोजी महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या खैरलांजी गावात घडले. या दिवशी गावातल्या एका कुटुंबातल्या चार जणांची सायंकाळच्या सुमारास गावातल्याच जातीयवादी लोकांकडून अमानुष हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली.या घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले.
अनेक भीमसैनिकांवरती आंदोलनाचे गुन्हे दाखल करण्यात आले. काहींवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला.घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल 15 सप्टेंबर 2008 रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.. या हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे २० जानेवारी २०१७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
खैरलांजी जिल्हा भंडारा येथील आरोपींनी उरलेली शिक्षा माफ करण्याचा अर्ज सरकारकडे केल्याची माहिती मिळताच “नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस “या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते,राज्य सचिव पी.एस.खंदारे,ऍड.नवनाथ भागवत (गिते),राजेश साळे, राजवीर वैभव गिते यांनी तात्काळ भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावामध्ये जाऊन सद्यस्थितीची माहिती घेतली.
खैरलांजी गावातील पोलीस पाटील, बार्टीचे मोहाडी तालुक्याचे समता दूत यांच्याकडून गावातील आरोपींची व केस च्या सद्यस्थितीची अद्ययावत माहिती घेऊन भोतमांगे परिवाराच्या घराजवळ जाऊन पाहणी केली असता शेजारील लोकांनी भोतमांगेंच्या घराच्या जागेवर गुरे बांधून अतिक्रमण केले होते. ते काढायला लावले.
घराच्या विटा माती,दगड,पत्रे सगळं काही जातीयवादी लोकांनी नष्ट केले आहे.
फक्त एक लोखंडी पलंग अनेक वर्षापासून तिथे आहे. ज्या ठिकाणी हे दुर्दैवी हत्याकांड घडले त्या ठिकाणी थांबून जिथे भोतमांगे परिवारातील सदस्यांचे प्रेत टाकण्यात आले होते त्या ठिकाणी पुन्हा जाऊन आले
खैरलांजी गावाच्या चौकामध्ये थांबून. ग्रामपंचायतच्या पुढे सार्वजनिक पाण्याचा आड आहे त्या पाण्याच्या आडाजवळ थोडा वेळ थांबले
भोतमांगे यांची हुशार मुलगी प्रियंका या आडाजवळ आल्यावर तिला जातीवादी गुंड छेडत असायचे.आता हा आड वापरासाठी बंद केला आहे. ज्या शेतावरून भांडण होत होते त्या शेतामध्ये गेले असता माहिती मिळाली की भैयालाल भोतमांगे यांचे नातेवाईक यांनी एक वर्षापूर्वी ही शेती विकली आहे. खैरलांजीच्या प्राथमिक शाळेमध्ये जाऊन आले अंगणवाडी मध्ये गेले गावामध्ये सर्वत्र फिरत असताना.
संपूर्ण गाव त्याच्याकडे पाहत होता पण त्याच्या जवळ येण्याची हिंमत कोणी करत न्हवता.
त्यानंतर भैयालाल भोतमांगे व त्यांच्या कुटुंबीयांच्या समाधीस्थळी जाऊन विनम्र अभिवादन करून भैय्यालाल भोतमांगे यांना सर्वांनी मिळवून दिलेली शासकीय जमीन शोधली. भंडारा शहरांमध्ये जाऊन
पोलीस अधीक्षक भंडारा ग्रामीण व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांना भेटून आरोपींना फाशी झाली पाहिजे यासाठी कसल्याही .प्रकारची शिक्षा मध्ये कमी होऊ नये याकरिता पुन्हा मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची मागणी केली.
NDMJ च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भैय्यालाल भोतमांगे यांना त्यावेळी देखील पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत मदत केली आहे आणि आज देखील या प्रकरणात प्रामाणिकपणे लढत आहेत.
क्रमशः
वैभव तानाजी गिते
राज्य सचिव
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस
8484849480



