कामगिरीला पीआरची गरज…! नितीश राणाने गौतम गंभीरबाबत केलं असं वक्तव्य, सोशल मीडियावर चर्चा

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर गौतम गंभीरचा खडतर काळ सुरु आहे. टीम इंडियाने वनडे आणि कसोटी मालिकेत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या प्रशिक्षणावरीही ताशेरे ओढले जात आहे. असं असताना नितीश राणाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत 3-0 ने मात खाल्ल्यानंतर टीम इंडियाची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतही निराशाजनक कामगिरी राहिली आहे. खरं तर या गौतम गंभीरने प्रशिक्षकपद हाती घेतल्यानंतर टीम इंडियाची अशी स्थिती झाल्याची ओरड सोशल मीडियावर होत आहे. टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं स्वप्नही भंगलं आहे. असं असताना त्याच्यासोबत एकाच टीम खेळलेल्या मनोज तिवारीने गंभीरवर टीका केली आहे. असं असताना आता गौतम गंभीरच्या समर्थनार्थ नितीश राणा मैदानात उतरला आहे. 2018 ते 2024 पर्यंत नितीश राणा कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळला असून गौतम गंभीरच्या पाठीशी उभा राहिला आहे. कामगिरी करणाऱ्याला पीआरची गरज नसते, असं सांगत गौतम गंभीरचं कौतुक केलं आहे.

नितीश राणाने एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, ‘टीका ही वैयक्तिक असुरक्षिततेवर आधारित नसून वस्तुस्थितीवर आधारित असावी. गौती भैया हा मला भेटलेल्या निस्वार्थी खेळाडूंपैकी एक आहे. कठीण प्रसंगी तो इतर कोणाचीही जबाबदारी घेतो. कामगिरीला कोणत्याही पीआरची गरज नसते. ट्रॉफी त्यांच्यासाठी बोलतात.’ दरम्यान मनोज तिवारीने आरोप करताना सांगितलं होतं की, ” गंभीर एक ढोंगी आहे . तो जे बोलतो ते करत नाही. कर्णधार रोहित शर्मा मुंबईचा आहे. अभिषेक नायर मुंबईचा आहे. रोहितला प्रत्येक गोष्टीत पुढे ढकलण्यात आले आहे. जलज सक्सेनासारख्या खेळाडूसाठी कोणीच बोलणारं नाही. तो सतत चांगली कामगिरी करत आहे, पण तो गप्प बसतो.’ मनोज तिवारी पुढे म्हणाला की, रोहित आणि गंभीरमध्ये काहीही चांगले चालले नाही.

नितीश राणाने 2016 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएल करिअरला सुरुवात केली होती. पण 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग झाला. 2024 पर्यंत नितीश राणा कोलकात्यासाठी खेळला. पण आयपीएल मेगा लिलावात नितीशसाठी राजस्थानने बोली लावली आणि संघात घेतलं. राजस्थानने नितीशसाठी 4.20 कोटी रुपये मोजले. नितीश राणाने आतापर्यंत 107 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 101 डावात 28.65 सरासरीने 2636 धावा केल्या आहेत. यात त्याने 18 अर्धशतकं ठोकली आहेत. यात 87 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!