डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सकल मातंग समाजाने दिल्या शुभेच्छा

फलटण – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने त्यांच्या पुतळ्यास फलटण तालुका सकल मातंग समाज यांच्यावतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी शाहू, फुले, आंबेडकरी चळवळीतील खुशल अभ्यासू नेतृत्व विजयजी भोंडवे यांनी डॉ बाबासाहेबांनी या भारत देशातील प्रत्येक लहान, मोठया स्त्री, पुरुषांणसाठी केलेल्या व देश हितासाठी केलेल्या कामा संदर्भातील विस्तृत अशी माहिती सांगितली व त्यांनी केलेल्या कार्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी ज्ञानेश्वर घोलप, सागर इंगळे,मंगेश आवळे, किशोर आवारे,संतोष खवळे,रंजीत अवघडे,राहुल रिटे,विजय भोंडवे,व इतर समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते



