शोषित पीडिताचा आधार-स्तंभ मा. वैभवजी गिते साहेब यांचा वाढदिवस फलटण मधील ” आई अनाथाश्रमा ” मध्ये महिलांना साड्या व खाऊ वाटप करून अनोख्या पद्धतीने केला साजरा

फलटण – अन्याय अत्याचार लोकांसाठी लढणारे खंबीर नेतृत्व महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी अत्याचार झालेल्या लोकांच्या पाठीमागे, कित्येक जातीवादी लोकांमुळे युवकांचे पुरुषांचे तसेच महिलांचे बळी जात असतात आणि त्यांच्या कुटुंबाला आधार नसतो त्यावेळी त्यांना आधार देणारे नेतृत्व म्हणजे वैभवजी गीते साहेब आहेत.आज त्यांचा वाढदिवस सर्वत्र विविध माध्यमातून साजरा केला जात आहे याच अनुषंगाने आज फलटण या ठिकाणी आई अनाथ आश्रम मध्ये असणाऱ्या महिलांना साडी वाटप सह खाऊ वाटप करण्यात आला.
वाढदिवस म्हणजे जणू अन्याय झालेल्या लोकांना न्याय देण्याकरिता झालेला हा वाढदिवस अन्याय कोणावरती होऊ नये असे एकमेव नेतृत्व म्हणजे वैभव गीते साहेब आहेत आणि म्हणूनच त्यांचा वाढदिवस आई अनाथ आश्रम मध्ये कित्येक महिला अशा आहेत की त्या महिलांना कोणीच नाही आणि इतरत्र भटकत असताना या आश्रम मध्ये लोखंडे सर यांच्या माध्यमातून या महिलांना एकत्रित करून चांगल्या प्रकारे वागणूक तसेच व्यवस्थित संभाळ केला जात आहे म्हणून या अनाथाश्रम मध्ये वैभव जी गीते साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित विशेष सरकारी वकील बापूसाहेब शीलवंत, आझाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष महादेव आप्पा गायकवाड, प्रेम मोरे बहुजन समाज पार्टी तालुका अध्यक्ष , लोकध्यास चे संपादक राजकुमार काकडे, साप्ताहिक सातारा सम्राट चे संपादक गोविंद मोरे, सामाजिक कार्यकर्ते जय भैय्या माने इत्यादी उपस्थित होते