महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने डी. पी. आय. ने शिवाजी वाचनालयास महापुरुषाची पुस्तके दिली भेट

फलटण –
पुस्तके हे मानवाचे परम मित्र आहेत.पुस्तके प्रसंगी मार्गदाते बनून आयुष्यात सुखी होण्याचे मार्गदर्शन करतात.तरूणाईमध्ये वाचनाची गोडी वाढावी.या हेतूने डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (DPI) फलटण तालुक्याच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची १९८ वी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्त फलटण शहरांमध्ये असणारे छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय येथे महापुरुषांच्या विचारांची पुस्तके संच प्रदान करण्यात आला.यावेळी आमचे मोठे बंधू,मार्गदर्शक मा.अमरसिंह संकपाळ (बाबा),(युथ अध्यक्ष सा.जि.DPI) मा.मंगेश प्र.आवळे,भा.यु.पॅंथरच्या.पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा.मंगलताई जाधव,मा.जेष्ठ नेते.विजय भोंडवे (सरकार),(अध्यक्ष फ.ता.DPI) मा.निलेश घोलप, (अध्यक्ष फ.श.DPI),भा.यु.पॅंथरचे फ.श.अध्यक्ष.राहुल गुंजाळ,मा.आदित्य पाटोळे व इतर बांधव उपस्थित होते.