पश्चिम महाराष्ट्र विभाग सचिव पदी श्री वैभव सुरेश कांबळे (विटा) यांची नियुक्ती

प्रतिनिधी –
अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या सचिवपदी श्री. वैभव सुरेश कांबळे (विटा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. वैभव कांबळे हे एक सामाजिक कार्यकर्ते असून, त्यांनी अनेक वर्षे समाजातील गरजू घटकांसाठी कार्य केले आहे. त्यांची सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि कार्यक्षमतेच्या आधारे समितीने त्यांच्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिली आहे.
सदस्य क्रमांक MH/0413/25 असलेल्या श्री वैभव कांबळे यांचा जन्म 08 जानेवारी 1988 रोजी झाला असून, त्यांचे कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पश्चिम विभागात समितीचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. प्रदीप पाठक यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.