यु पी एस सी च्या परीक्षेत “बार्टी “या संस्थेच्या 11 विध्यार्थ्यांची निवड

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या( यूपीएससी ) नागरी सेवा 2024 परीक्षेच्या निकालात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या “बार्टी”च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले संस्थेच्या एकूण 11 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
“बार्टी” या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी (युपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येते तसेच मुख्य परीक्षा आणि मुलाखत चाचणीसाठी पात्र उमेदवारांना आर्थिक साह्य दिले जाते सामाजिक दृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि कौशल्य वृद्धीच्या दिशेने चालना देण्याचे काम “बार्टी” च्या माध्यमातून केले जात आहे
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी
1) आयुष राहुल कोकाटे ( क्र. 513)
2) सावी श्रीकांत बुलकुंडे (क्र. 517)
3) प्रांजली खांडेकर (क्र. 683)
4) अतुल अनिल राजुरकर (क्र. 727)
5) मोहिनी प्रल्हाद खंदारे (क्र. 844)
6) अजय नामदेव सरवदे (क्र. 858)
7) अभिजय पगारे (क्र. 886)
8) हेमराज हिंदुराव पानोरेकर (क्र. 922)
9) प्रथमेश सुंदर बोराडे (क्र. 926)
10) सुमेध मिलिंद जाधव(क्र. 942)
11) आनंद राजेश सदावर्ते (क्र. 945)
सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची समतेच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून देशभरात दखल घेतली जात आहे “बार्टी”चे महासंचालक सुनील वारे, व इंदिरा अस्वार, शुभांगी पाटील आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले कठोर मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि संसाधनाचा वापर याच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले
” यंदाचे यूपीएससी मधील विद्यार्थ्यांचे यश हे संस्थेच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणावी लागेल असे “बार्टी”चे महासंचालक सुनील वारे हे म्हणाले “