भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवजयंतीच्या दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्राचे कुलदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलताई जाधव, रजियाताई शेख, वदंनाताई यादव, पूजा जाधव, मनीषा मोरे व संघटनेचे मार्गदर्शक विजय भोंडवे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.