प्रहार जनशक्ती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे फलटण तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

फलटण येथे प्रहार जनशक्ती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे फलटण तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन तहसीलदार यांना निवेदननाद्वारे मागणी सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी असे प्रहार जनशक्ती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले
निवेदनात असे म्हटले आहे की तहसिल कार्यालय फलटण संजय गांधी विभागातील नायब तहसीलदार श्रीमती भक्ती सरवदे – देवकाते या दिव्यांग, विधवा, तसेच ज्येष्ठ नागरिकांना व निराधार व्यक्तींना अरेरावीची भाषा वापरून हीन स्वरुपाची वागणूक देतात दिव्यांगांनी कोणत्याही समस्येवर विचारणा केली असता माझ्या कडे अधिकार नसून सर्वस्वी अधिकार मा. तहसीलदार यांना आहेत अशी उडवाउडवीची उत्तरे देतात यावरून असे समजते की श्रीमती सरवदे देवकाते यांना कोणतेही कायदेशीर ज्ञान नसून त्या अज्ञान असल्याचे दिसून येते त्याच बरोबर संजय गांधी निराधार योजनेची मंजुरी पात्र लाभार्थी यादी लावण्यास विलंब, ३ महिन्यातून एकदा मिंटिंग घेतली जाते तसेच विचारणा केली असता २-३ दिवसांत मिटिंग होईल असे बोलतात व मिटिंग दिवशी गेल्यानंतर कालच मिटिंग झाली असे खोटे बोलले जाते १ वर्षापासून लाभार्थी लाभापासून वंचित ठेवले जातात याचे पुरावे आमच्या कडे आहेत यावरून असे समजते की सदर अधिकारी या बेजबाबदार असून त्या जबाबदार पदावर काम करण्या योग्य नसल्याने आम्ही दिलेल्या पुराव्याच्या आधारावर सेवा हमी कायदा व दफ्तर दिरंगाई कायदा अंतर्गत कारवाई संबंधितांवर ८ दिवसांत कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल आम्हास प्राप्त न झाल्यास आम्ही तहसिलदार कार्यालय समोर प्रहार जनशक्ती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना ठिय्या आंदोलन करणार आहे यावेळी सागर गावडे, महेश जगताप, राहुल गावडे, जितेंद्र मोहीते, अभिषेक गुंजवटे, उपस्थित होते.