लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी सातारा जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा भीम आर्मी संघटनेची मागणी….     


         फलटण :  साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती 1आँगस्ट रोजी देश, विदेशात, मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते . मजुरांची, हमालांची, गुलामाची, शेतकऱ्यांची व्यथा आपल्या कांदबरीतून मांडणारे लोकशाही अण्णा भाऊ साठे हे समस्त कामगारांचे ,वंचितांचे, उद्धार कर्ते आहेत .  संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाचे योगदान असुन . त्यांनी समाजात विज्ञानवाद, समता, स्वातंत्र, बंधुता , रूजविण्या साठी समते साठी आयुष्य भर लढा दिला . त्याच्या कार्याची दखल घेत रशिया या देशाने त्याचां सन्मान केला . आपल्या भारत देशाने सुध्दा त्यांचा सन्मान केला . परंतु जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी नसल्या मुळे अनेक समाज बांधवांना ईच्छा असुन सुध्दा आण्णा भाऊ साठे यांना आभिवादन करता येत नाही , त्याच्या विचारांचा प्रसार करता येत नाही, त्यांच्या मुळ गावी वाटेगाव ला जाता येत नाही , तरी आपण सातारा जिल्हात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी .अशी भीम आर्मी संघटने ने विभागीय दंड अधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे . त्या वेळी भीम आर्मी संघटनेचे फलटण शहर, तालुका, जिल्हा पद अधिकारी उपस्थित होते.
अजित संभाजी मोरे,  लक्षण काकडे, सुनिल पवार, आदेश कांबळे, राहुल गुंजाळ,  यश अवगडे, कुणाल अहिवळे,विजय भोंडवे , भाई मुलाणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!