नाशिक पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा जन ग्रामीण पत्रकार संघाकडून निषेध: गुंडावर कठोर कारवाईचे कोल्हापूर पोलीस प्रमुखांना निवेदन.

नाशिक : 27 सप्टेंबर 2025
नाशिक येथील त्र्यंबकेश्वर शहरात वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी योगेश खरे, योगेश सोनवणे आणि किरण ताजने यांच्यावर काही खासगी वसुली ठेकेदारांनी, गाव गुंडानी केलेल्या अमानुष हल्ल्याचा जन ग्रामीण पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध व्यक्त करत घडलेली घटना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला थेट हल्ता असून, हे कृत्य अत्यंत निंदनीय,संतापजनक व अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमुळे सरकारचा खासगी वसुली ठेकेदारांवर कोणताही अंकुश नसल्याचे स्पष्ट होते. पत्रकार समाजासमोर सत्य मांडण्याचे काम करत असताना, त्यांच्यावर असे हल्ले होत असतील तर लोकशाहीची मूल्ये धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करत सदर घटनेचा एकमताने निषेध करण्यात आला.
या घटनेचा मुख्य सूत्रधार शोधून काढण्यात यावा आणि या सर्व आरोपीवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून, हे प्रकरण अति जलद न्यायालयात चालवून आरोपींना तातडीने शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी व पत्रकार बांधव यांच्या वतीने कोल्हापूर पोलीस अधीक्षक श्री सुवर्णा पत्की आर्थिक गुन्हे शाखा यांना निवेदन देण्यात आले.
जनग्रामिण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शैलेद साळे सर, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे सर, कार्याध्यक्ष युवराज़ देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय सनदी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नागेंद्र जाधव, अंकुश दिंडे, संजय, दिंडे,आनंद कांबळे,अनिल राणे,संजय शेंडे , राजेश कांबळे,रवी पाटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते .