फलटण तालुक्यामध्ये “अनुसूचित जाती जमाती” प्रवर्गातील काही विशिष्ट” जाती “असुरक्षित……

फलटण – दि. 31 डिसेंबर 2025
फलटण तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील काही विशिष्ट जातीच असुरक्षित असल्याचे चित्र दिसून येत आहे या जातीतल्या लोकांची अशी अवस्था झाली आहे की “कोणीही यावं आणि टपली मारून जावे ” या म्हणी सारखे यांच्यावर अन्याय करण्यास कुठलाही धन दांडगा राजकीय वरदहस्त डोक्यावर असणारा मस्तवाल आक्का कुठलाही अन्याय करताना घाबरत नाही कारण की जणू काय त्याची याच कामासाठी नेमणूक केली आहे व त्याचा जन्म ही अन्याय करण्यासाठीच झालेला आहे असे चित्र फलटण तालुक्यात दिसून येत आहे त्यांना कुठल्याही कायद्याचा धाक राहिलेला दिसून येत नाही त्याना असे वाटते की आम्ही पैशाच्या जोरावरती सगळी प्रशासकीय व्यवस्था विकत घेऊ शकतो. अनुसूचित जाती या प्रवर्गातील घटक महसूल प्रशासन,सहकार प्रशासन, किंवा पोलीस प्रशासन,असो या प्रवर्गातील जातीला या कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थ मध्ये न्याय मिळताना दिसत नाही. त्याचेच एक उदाहरण पोलीस स्टेशनला एखाद्या धनदंड्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता फलटण शहर पोलीस स्टेशन असो किंवा ग्रामीण पोलीस स्टेशन असो त्यांची तक्रार या धन दांडग्याच्या विरोधात नोंदवून घेतली जात नाही. उलट तक्रार देण्यास जाणाऱ्या वरतीच गुन्हे दाखल केले जातात. म्हणून जर का भीतीने व न्याय मिळण्याच्या दृष्टीने या प्रवर्गातील लोकांनी सातारा येथे एस पी साहेबांना व फलटण येथे डी वाय एस पी,साहेबांच्या ऑफिस कडे तक्रारी अर्ज तक्रार नोंदवून घेण्यासाठी केला असता तो अर्ज फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी खाली येतो परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आलेल्या चौकशीसाठीच्या पत्राला पोलीस स्टेशनमध्ये कुठलंही महत्व न देता त्या पत्राला दाखवले जाते कचऱ्याची टोपली. तक्रारदाराला बोलावून त्याच्या तक्रारी संबंधित कसलीही चौकशी केली जात नाही ना त्या तक्रारारीच्या अनुषंगाने ज्याच्या वरती तक्रारी अर्ज आलाय त्याची कसलीही चौकशी कित्येक दिवस व महिने केली जात नाही ना गुन्हा नोंदवून घेतला जातो त्यामुळे फलटण तालुक्यामध्ये लोकशाही अस्तित्व आहे की नाही असे प्रश्नचिन्ह अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांच्या मनात निर्माण झाले आहे. हजारो वर्षे गाव कुसाबाहेर राहून अन्याय सहन करणाऱ्या लोकांना आजही लोकशाही असणाऱ्या देशामध्ये प्रस्थापित लोकांकडून व प्रशासकीय अधिकाऱ्या कडून त्यांनी केलेला अन्याय सहन करावा लागत आहे शासनात बसलेले प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांचे हात मिळवणी करून हे या अन्यायकर्त्या व्यक्तींच्याच पाठीशी उभे राहून त्यांना पाठबळ देताना दिसून येत आहे अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांच्या संपत्ती संदर्भातील बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी लुटल्या जातात याच्याकडेही कुठल्याही महसूल प्रशासकीय अधिकाऱ्याचे व पोलीस प्रशासनाचे कसलेही लक्ष नाही उलट तेच प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन त्यांना प्रोटेक्शन देऊन त्यांच्या संपत्ती लुटण्यासाठीची परवानगी देत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे .
फलटण तालुक्यामधील आता थोड्याच दिवसांपूर्वी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची दक्षता कमिटी तयार झाली त्यामध्ये आमदार साहेब व सामाजिक कार्यकर्ते यांची नावे घेतली गेलेली आहेत हे दक्षता कमिटीतील सदस्य अनुसूचित जाती व जमातीवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात पोलीस स्टेशनला जाऊन जाब विचारणार का ?
सविस्तर बातमीसाठी वाचा सा. लोकध्यासचा पुढील अंक…….
वाचा पुढील बातमी
!! 2017 मधील फलटणचे सावकारकी प्रकरण व कोण होता सहकार क्षेत्रातील सहकाराच्या नावाखाली सावकारकी करणारा सातारा जिल्ह्यातील सर्व सावकारांना अर्थ पुरवठा करणारा फलटण मधील स्वयंघोषित सहकार महर्षी बडा सावकार( आक्का) या बाबत सविस्तर वृत्तांत !!



