! फलटण येथील स्मशान भूमी मध्ये अंत्यविधीला जाण्यासाठी पर्यायी प्रवेशव्दाराच्या मागणी साठी भीम आर्मी संघटनेचे फलटण नगर पालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन…….!

फलटण : फलटण नगर पालिकेची असणारी सार्वजनिक स्मशान भूमीला दोन्ही बाजूंनी प्रवेश द्वार करण्या साठी भीम आर्मी संघटने निवेदना व्दारे फलटण नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितले होते की फलटण शहरातील असणारी स्मशानभूमी आपुरी पडत असून बरेच अंत्यविधी साठी बरेच अडथाळे येत असुन आपण पर्यायी प्रवेश द्वार करवावे जेने करून होणारी गैर सोय टाळता येईल परंतु सामाजिक बांधिलकी नसणारे, कर्तव्य निष्ठा नसणारे मुख्य अधिकारी यांनी या मागणी कडे कडे दुर्लक्ष केले.
या मुळे भीम आर्मी संघटनेने आज फलटण नगर पालिकेच्या दालना समोर अंत्यविधी आंदोलन केले असुन संघटनेच्या प्रमुख मागण्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे * फलटण येथील स्मशान भूमीला अंत्यविधी साठी पर्यायी प्रवेश व्दार पुणे रोड कडून करावे. *फलटण स्मशान भूमीच्या दोन्ही बाजुस पार्किंग करावे .*आतील व बाहेरील बाजूस अतिरिक्त प्रकाशमय वीज खांब बसवावेत ३)स्मशानभूमी लगत वृक्ष लागवड करावी ..या मागण्या असुन मान्य न झाल्यास जिल्हा अधिकारी सातारा यांच्या दालना २०/१०/२५ रोजी समोर अमरण उपोषण करणार असल्याचे संघटनेने सांगितले आहे. या वेळी संघटनेचे
आजित संभाजी मोरे, लक्ष्मण काकडे, सुनील पवार, आदेश कांबळे, विजय कांबळे, कुणाल अहिवळे, सनी पवार, भाग्यश्री कांबळे हे उपस्थित होते