अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ…….!

फलटण :दि. 3 जून 2026
फलटण तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील धग धगती मशाल अन्यायाच्या विरुद्ध बंड करून दंड थोपटणारा भीम योद्धा म्हणजे महादेव उर्फ आप्पा गायकवाड महाराष्ट्रामध्ये कुठे हि अन्याय झाला, कुठल्याही समाजातील गोरगरिबावर अन्याय – अत्याचार झाला, कामगारांना न्याय मिळेना, प्रशासन दाद देईना, तर सर्वसामान्यांच्या तोंडातून पहिल्यांदा एकच नाव बाहेर पडतं… ते म्हणजे आंबेडकरी चळवळीतील भीमयोद्धा पॅंथर महादेव (आप्पा )गायकवाड.
“चला महादेव आप्पांकडे जाऊ… अध्यक्ष न्याय मिळवून देतील…” असं एक विश्वसनीय स्थान व नातं तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण केलेला दलित चळवळीतील कार्यकर्ता म्हणजे (आप्पा )हा विश्वास आज फलटण तालुक्यातल्या अनेक गोरगरीब लोकांच्या मनात आहे. आंदोलन असो, मोर्चा असो, रास्ता रोको असो की प्रशासनाला जाब विचारायचा असो… महादेव आप्पा नेहमी लोकांच्या पुढं उभे राहिलेला दिसतो. त्यामुळेच समाजातील गोरगरीब , माणसांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे.
महादेव( आप्पा ) गायकवाड यांनी आपलं आयुष्य बुद्ध, शिव, शाहू , फुले,आंबेडकर,अण्णाभाऊ यांच्या विचारांना समर्पित केलं आहे. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांच्या विचाराचा मूलमंत्र त्यांनी आपल्या कामातून जिवंत ठेवला आहे. समाजातील पीडित, वंचित आणि कष्टकरी लोकांसाठी लढणं हेच त्यांनी आपलं ध्येय मानलं.
फलटण तालुक्यात कुठंही कोणत्याही गावात अन्यायाची घटना घडली की महादेव (आप्पा) शांत बसत नाही. एखाद्या गरीब कुटुंबावर अन्याय झाला, दलितांवर अत्याचार झाला, एखाद्या कामगाराला हक्कापासून वंचित ठेवलं, तर आप्पा तिथं धाव घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम करत असतात .अनेक वेळा त्यांनी प्रशासनाच्या दारात ठिय्या आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवेदनं दिली आणि गरज पडली तर रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्यामुळेच प्रशासनालाही “महादेव गायकवाड (आप्पा) यांची उपस्थिती म्हणजे प्रश्न गंभीर आहे” याची जाणीव असते.आप्पांच्या कार्याची खरी ताकद म्हणजे त्यांची समाजाशी जोडलेली नाळ. तो फक्त भाषण करणारा नेता नाही, तर लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांचं दुःख आपलं मानून एकरूप होणारा कार्यकर्ता आहे. फलटण शहरातील, गावागावातील गरीब, कामगार, शेतमजूर यांच्याशी त्यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे लोकही त्यांना आपला हक्काचा माणूस मानतात.कामगार संघर्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. अनेक कामगारांना नोंदणी, विमा योजना, आर्थिक मदत, सुरक्षा साहित्य आणि इतर हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. “कामगारांचा नेता” म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली आहे.महादेव आप्पांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणाबद्दल असलेली त्यांची आस्था. समाजातील गरीब विद्यार्थ्यांनी शिकून मोठं व्हावं, त्यांनी बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढं जावं, यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. अनेक गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शालेय साहित्य, फी भरण्यासाठी मदत अशा माध्यमातून त्यांनी अनेकांना आधार दिला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं कामही ते सातत्याने करत असतात.
आजच्या काळात अनेक जण राजकारणासाठी समाजकारण करतात; पण महादेव आप्पांनी समाजकारणातून लोकसेवा करून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्यांचं कार्य हे केवळ एका समाजापुरतं मर्यादित नाही. कोणत्याही जाती-धर्माच्या माणसावर अन्याय झाला तरी आप्पा त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. त्यामुळेच त्यांना सर्व समाजातून प्रेम आणि सन्मान मिळतो.फलटण तालुक्यात आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यात मोलाचा वाटा आप्पांचा आहे. आंबेडकर विचाराने समाज जागा ठेवण्याचं, तरुणांना संघटित करण्याचं आणि अन्यायाविरोधात लढण्याचं काम त्यांनी सातत्याने सुरू ठेवलं आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक तरुण सामाजिक चळवळीत सक्रिय झाले आहेत.
संघर्ष, जिद्द आणि समाजासाठी झटण्याची वृत्ती यामुळे महादेव( आप्पा )गायकवाड हे आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. समाजासाठी रात्रंदिवस धावणारा हा माणूस म्हणजे सामान्यांच्या हक्काचा फलटण तालुक्यातील लढवय्या भिमसैनिक आहे.अशा या लढवय्या, विचारांच्या आणि समाजहितासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या भीमयोद्धाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने महादेव (आप्पा )गायकवाड यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून असंच समाजकार्य घडत राहो, हीच सा. लोकध्यास परिवाराच्या वतीने सदिच्छा…!



