संदीपकुमार जाधव यांचा “शिवसेना एकनाथ शिंदे “गटात प्रवेश

फलटण:

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ग्राहक ही समिती या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री संदीपकुमार कैलास जाधव यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेना एकनाथ शिंदे गटात यशवंतराव चव्हाण सभागृह कराड येथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पर्यटन खनिज काम व माजी सैनिक कल्याण मंत्री मा. ना. शंभूराजे देसाई व सातारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री शरद कणसे व सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश केला.

नुकतच फलटण शहरातील एक तरुण कार्यकर्ता भारतीय जनता पक्ष का सोडून जातो अशी चर्चा असताना. संदीपकुमार कैलास जाधव यांनी एका खाजगी युट्युब चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीमुळे ते तरुण कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत होते

संदीपकुमार जाधव व त्यांचे सहकारी तुमच्या प्रवेशामुळे फलटण शहर व तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष वाढीसाठी काम करावे संघटन मजबूत करावे त्यांचे भविष्य चांगले असेल असे मत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई त्यांनी व्यक्त केले भावी वाटचालीस सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांचे विचार तसेच पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामाने प्रभावित होऊन शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे मत संदीपकुमार जाधव यांनी व्यक्त केले. त्यांच्या समवेत प्रकाश नांदेले, स्वाती फुलारी, प्रकाश बोधे – इनामदार ,ऋषिकेश नलावडे, आनंद सुतार, अनुप पवार, तुषार फरतडे, शरद बनकर, प्रेम घाडगे, अशा अनेक कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे,विधानसभा संघटक विराज खराडे,तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पवार,तालुका प्रमुख नानासो इवरे,तालुकाप्रमुख हेमंत सुतार,शहर प्रमुख निलेश तेलखडे, गणेश चोरमले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!