एक सच्चा व निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ता

दलित चळवळतील, धगधगता ज्वालामुखी,सच्चा दिलदार निष्ठावंत कार्यकर्ता,सकल मातंग समाजाच्या व दीन दलितांच्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या अडीअडचणीच्या काळातील आधारस्तंभ म्हणजे विजयराव भोंडवे सरकार
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांचे खंदे व कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ख्याती व ओळख आहे असे गुणवंत गुणसंपन्न व्यक्तिमत्व असणारे विजयराव भोंडवे सरकार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या अष्टपैलू जीवना विषयीची थोडक्यात गाथा
राजे गटाशी गेली 30 वर्षे निष्ठावंत कट्टर राहून प्रामाणिकपणे लोकसेवा करणारा अवलिया म्हणजे भोंडवे सरकार, झुंजार तडफदार अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे भोंडवे सरकार, स्वाभिमानी,बुद्धिवंत,प्रतिभावंत कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणजे भोंडवे सरकार, शिव,शाहू,फुले आंबेडकर,अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचा गाढा अभ्यास असणारे व त्यांचे विचार सर्वसामान्यांच्या मनात रुजवणारे व्यक्तिमत्व म्हणजे भोंडवे सरकार
अशा वैचारिक वैभवशाली कार्यकर्त्याच्या आज 1 जून रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना माझ्या काकडे
कुटुंबीयांकडून व लोकध्यास परिवाराच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!!
संपादक – सा. लोकध्यास