फलटण तालुक्यामध्ये आजही          दलित असुरक्षितच, DYsp  ऑफिस,  फलटण शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन येथे होतोय अन्याय ……..?

         हजारो  वर्ष गाव कसा बाहेर राहून किड्या मुंग्या सारखे जीवन जगणाऱ्या  दलितांना आजही जातीय वर्णव्यवस्थेच्या वेळाख्यातच अडकून ठेवलेल दिसत आहे फलटण तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेमधील पोलीस प्रशासन असो, महसूल प्रशासन असो,सहकार प्रशासना असो  महालेखा परीक्षण प्रशासन असो,भूमी अभिलेखा प्रशासन असो यामधील अधिकारी आज ही दलितांवर अन्याय  करताना मागेपुढे पहात नाहीत असे चित्र पूर्ण फलटण तालुक्यात दिसून येत आहे राजकीय वरद हस्त डोक्यावर असणारे धनदांडगे दिवसाढवळ्या दलितांवर अन्याय करत असताना पोलीस प्रशासन फक्त बघायची भूमिका घेत असताना दिसत आहे                               एखादा दलित अश्या धनदांड्याच्या विरोधात एफ आय आर नोंद करण्यासाठी गेल्यानंतर त्याची एफ आय आर  नोंद करून घेतली जात नाही  परंतु त्यास वेगळ्या पद्धतीने कायदा समजून सांगितला जातो व तो त्या धन दांडग्या वरती एफ आय आर कशी नोंद करू शकत नाही असे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले जाते त्याची काही उदाहरणे दिली जातात. व त्या अन्यायग्रस्तास  तेथून त्याचे म्हणणे न ऐकताच हुसकवून लावले जाते  .                                                                                         त्याच्यावरती धन दांडग्यांकडून  कितीही अन्याय झालेला असेल तरीही त्याची एफ आय आर धन दांडग्यांच्या विरोधात घेतली जात नाही मात्र त्याच्यावरती एखाद्या धन दांडग्याने एफ फायर करायची म्हटलं की लगेच घेतली जाते. पोलीस प्रशासनाकडून खूप अन्याय होताना फलटण तालुक्यामध्ये दिसत आहे. यावरती महाराष्ट्रातील सर्व दलित संघटनांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. व पुन्हा एकदा दलित संघटनांनी आपली पूर्वीसारखी वज्रमुठ बांधून अन्यायाच्या विरोध रस्त्यावर उतरले पाहिजे त्याशिवाय फलटण तालुक्यामध्ये दलितांना न्याय मिळू शकणार नाही… 

सविस्तर व विस्तृत बातमी पुढील अंकामध्ये  वाचा.

      दलितावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांच्या पाठीशी उभे राहून अन्याय कर्त्यावरती कायद्याचा आधार घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दक्षता कमिटीची शासनाच्या वतीने स्थापना झालेली आहे. परंतु त्या मध्ये असणाऱ्या सदस्यांनी आजपर्यंत दक्षता कमिटीची स्थापना झाल्यापासून पोलीस प्रशासनाला कधी जाब विचारलेला आहे का ? दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात एफ आय आर दाखल करून का घेतली जात नाही. उलट एखादा दलित पोलीस स्टेशनला एखाद्या अन्याय कर्त्याच्या विरोधात  पोलीस केस करण्यासाठी गेल्यानंतर लगेच त्या धन दांडग्याच्या डोक्यावर हात असणाऱ्या बड्या बड्या लोकांचे फोन येतात की आलेल्या व्यक्तीची एफ आय आर नोंद करून घेऊ नका व मग त्या दलिताची एफ आय आर नोंद करून घेतली जात नाही. खरेच तर त्या दक्षता कमिटी मध्ये फक्त आणि फक्त दलित समाजातीलच लोक पाहिजेत. ते ही दलितांसाठी निष्ठेने व सेवाभावी वृत्तीने काम करणारे सच्चे कार्यकर्ते पाहिजेत .      

           त्यामुळे काही धन दांडग्याच्या दंडेल शाही मुळे दलितांवर फलटण तालुक्यामध्ये अन्यायकारक घटना घडत आहेत कायद्याच्या आधारावरती मिळणारा न्याय दलितांना मिळताना दिसत नाही याची कितीतरी उदाहरणे आहेत  फलटण तालुक्यामध्ये दलित कुटुंबातील कित्येक व्यक्तींचे  खून झालेले आहेत मात्र आरोपींना खडक शिक्षा होण्यासाठी योग्य तो तपास करताना पोलीस यंत्रणा दिसत नाही. कित्येकांच्या बाबतीत खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी लुटल्या जात आहेत

त्यामध्ये पोलीस, महसूल, सहकार, महालेखा परीक्षण, भूमी अभिलेख या सर्व विभागातील प्रशासकीय यंत्रणा धन  दांडग्याची पाठराखण करताना दिसत आहे


        लोकशाही प्रधान असणाऱ्या भारत देशामधील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दलितांवर होणारे अन्याय कमी होतील का ?

   पुढील सविस्तर बातम्या लवकरच लोकध्यास पोर्टल, लोकध्यास न्यूज यूट्यूब चैनल, लोकध्यास ई पेपर, व साप्ताहिक लोकध्यास वृत्तपत्रातील  बातम्यातून सविस्तर वाचण्यास व ऐकण्यास विसरू नका….!

1) फलटण तालुक्यामध्ये पोलीस प्रशासन दलितांवर कसा अन्याय करते आहे हे सविस्तर बातम्यांच्या माध्यमातून वाचा  व ऐका
2) महसूल प्रशासन हे अर्धन्यायिक व अर्ध प्रशासकीय अधिकार असणारा विभाग आहे त्या ठिकाणी चालणारे न्याय निवाडे कसे चालतात ते कसे चालले पाहिजेत याबद्दल सविस्तर बातमीच्या माध्यमातून वाचा व ऐका
3) सहकार विभाग म्हणजे सहाय्यक निबंधक ऑफिस येथे चालणारा कारभार, हा अर्धन्यायिक व अर्ध प्रशासकीय अधिकारी यांच्या अधिकाराखाली चालत असतो येथे न्यायनिवाडे सहकार कायद्याच्या नियमाने चालतात का ? हे सविस्तर बातमीच्या माध्यमातून वाचा व ऐका
4) महालेखा परीक्षण विभाग हा विभाग तर कित्येक लोकांना माहीतच नाही या विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्थांन मध्ये चाललेला कारभार व्यवस्थित चालू आहे की नाही याचे परीक्षण करणारा हा विभाग आहे पण या विभागाच्या माध्यमातून त्याचे परीक्षण व्यवस्थित होते का ? हे सविस्तर बातमीच्या माध्यमातून वाचा व ऐका
5) भूमी अभिलेखा विभाग हा विभाग ही अर्ध न्यायिक व अर्ध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालीच चालणारा विभाग  आहे येथेही  नियम, अटी व कायद्याचे पालन होते का ? हे सविस्तर बातमीच्या माध्यमातून वाचा व ऐका
     ”  या सर्व विभागाच्या कारभाराविषयी सविस्तर वृत्तांत लोक ध्यास पोर्टल, लोकध्यास ई पेपर, लोक ध्यास न्यूज यूट्यूब चैनल  व साप्ताहिक लोकध्यास यामधील बातम्याच्या माध्यमातून वाचा व ऐका….!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!