शिवजयंती निमित्ताने गुणवरे येथे भव्य रक्तदान शिबिर…..

फलटण : प्रतिनिधी
तथागत चारिटेबल ट्रस्ट गुणवरे व समस्त ग्रामस्थ गुणवरे यांच्यामार्फत भव्य रक्तदान शिबिर व मोफत दंत तपासणी, रक्त तपासणी शिबिर याचे गुरुवार दि. 19 फेब्रु. 2026 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी इ. 8 वी ते इ. 12 वी विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील संधीवर मान्यवरांच्याकडून मार्गदर्शन मेळावा ठेवण्यात आलेला आहे यावेळी विशेष सहकारी व मार्गदर्शन डॉ. चेतन दिलीप गुंदेच्या (एम डी एस रूट कॅनॉन स्पेशालिस्ट ) डॉ.सोनाली बुद्धभूषण आढाव (बी डी एस डेंटल सर्जन) डॉ.पालाश बाळासाहेब कांबळे (बी. एच. एम. एस. पी. जी. एम. एस.) सौ कोमल विश्वभूषण आढाव (बीएससी होम सायन्स डी. एम. एल.टी.) अक्षय ब्लड बँक,फलटण,स्वामी क्लिनिक लॅब फलटण अभिषेक प्रकाश तावरे (बी ई सिव्हिल इंजिनीयर गिरीधर सायन्स अकॅडमी फलटण) यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभणार आहे तरी या संधीचा सर्व इ. 8 वी ते इ. 12वी च्या विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाची निमंत्रण बुद्धभूषण अरविंद आढाव यांनी दिलेले आहे. ( रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक अशा भेट वस्तूही ठेवण्यात आलेले आहेत )
शिबिराचे ठिकाण : भैरवनाथ विविध कार्यकारी सह. सेवा सोसायटी लि. गुणवरे



