जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा कार्यालयासमोर धरणे आंदोलन………???

सातारा : दि. 23 मार्च 2026
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सातारा येथे शेतकरी संघटनेणं आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोरच धरणे आंदोलन सुरू केले आहे.
सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा येथे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी, शेतकऱ्यांच्या वीजबिल मुक्तीसाठी, सर्व सावकारांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी, सहकारी पतसंस्थांचे, बँकांचे, सोसायटीचे झालेले सर्व लिलाव रद्द करून घेण्यासाठी, व सर्वसामान्य नागरिकांची , बँका, सोसायटी व पतसंस्थांनी कशी लूट केली, सावकार कसे लुटतायेत व त्याच्यावर कसे उपाययोजना करायच्या, नोटरी वरील व्यवहार कसे गैर आहेत, बेकायदेशीर आहेत ते दाखवण्यासाठी, तुम्हाला शंभर टक्के कर्जमुक्त व्हायचे असेल तर सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक २३ मार्च २०२६ रोजी सातारा जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, सहकारा मधील चाललेला भ्रष्टाचार व शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवायची आहे.
ठेवीदारांचे पैसे बुडवणारे सहकार सम्राटांवर गुन्हे दाखल करायला लावायचे आहेत, गोरगरिबांच्या बेकायदेशीर लिलाव करणाऱ्या पतसंस्था वर गुन्हे दाखल करायचे आहेत, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर सहकारी बँका, पतसंस्थांच्या बोजा नोंदी करताच येत नाहीत, व १०१ वसूली दाखल्याला बारा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर कर्जाची वसुलीच करता येत नाही, शंभर टक्के कर्जमुक्ती झालीच पाहिजे सहकार खात्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे तो संपवायचा आहे व गैर कामाची चौकशी सुरू करायची आहे, कलम ८९, ८८, ८३, नुसार, बँका व पतसंस्थांची चोकशी झालीच पाहिजे, सर्वच कर्ज प्रकरणाचे टेस्ट ऑडिट स्वतंत्र लेखापरीक्षण, चाचणी लेखापरीक्षण हे झालेच पाहिजे, मात्र ह्या सहकार खात्यातील लोकांना हप्ते असल्याने ती कारवाई होत नाही हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी चलो सातारा!! चलो सातारा!! प्रत्येकाने माहिती अधिकार RTI अर्ज जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करायचे आहेत, तक्रारी करून हिशोब मागायचा आहे, व कोणती कारवाई केली ते विचारायचे आहे वाढीव वीज बिल व बिलामध्ये होणारे अन्यायाबाबत महावितरण विद्युत वितरण कंपन्या कशा लुटत आहेत. या अन्यायविरुद्ध दिनांक २५ मार्च २०२६ रोजी महावितरण कृष्णा नगर कार्यालयासमोर धरणे आंदोलन व मोर्चा होणार आहे, तरी सातारा जिल्ह्यातील सर्व ग्राहक, शेतकरी वर्ग, सामाजिक संघटना, सामाजिक संस्था, यांनी उपस्थित रहावे, आंदोलनामध्ये सहभाग घेतल्यानंतर तुमच्या कोणाच्याही मिळकतीचा लिलाव होऊ दिला जाणार नाही सावकार त्रास देणार नाहीत, सावकारांच्या ताब्यातील सर्व जमिनी आपणास प्रत्येक शेतकऱ्याला परत मिळवून द्यायचे आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या मिळकतीचे लिलाव झालेले आहेत ते रद्द होण्यासाठी आंदोलन करायचे आहे. पतसंस्था वाले. बैंक वाले, यांनी आपली खूप लूट केली. त्यांनी कसे लुटले ते निदर्शनात आणून देऊन कर्जमुक्त व्हायचे आहे. विज बिल चक्रवाढ व्याज लावल्याने आपण देणे लागत नाही, हे सिद्ध करून घ्यायचे आहे, सातारा जिल्ह्यातील सर्व, वीज वितरण चे ग्राहक व बँका व पतसंस्था संस्थांचे ठेवीदार, कर्जदार सभासदांनी उपस्थित राहण्यासाठी अवहान करण्यात येत आहे.
खालील शेतकरी संघटना पदअधिकारी कार्यकर्त्ते उपस्थित होते.
कोरेगाव तालुका अध्यक्ष धन्यकुमार जाधव (तात्या),
जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र वर्ग,
जिल्हा संघटक अशोकराव पाटील ,
शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा रंजनाताई पाटील सामाजिक कार्यकते : रामचंद्र येळवे ( बापू )
सामाजिक कार्यकर्ते : चंद्रकांत देशमुखे,
सामाजिक कार्यकर्ते: उत्तमराव पोळ,
अपंग जनता दल जिल्हाध्यक्ष, : अस्लम गुंडूलाल आंबेकरी कालेकर,
सामाजिक कार्यकर्ते : फौजी (बापू),
दक्षिण अध्यक्ष : संजय थोरात,
कराड तालुका अध्यक्ष : विनायकराव जाधव,
सामाजिक कार्यकर्ते : आनंदराव थोरात,
सामाजिक कार्यकर्ते : सचिन कापूरकर (बापू),
माजी सरपंच : वसंतराव चव्हाण (नाना),
सामाजिक कार्यकर्ते : महादेवराव देसाई,
टेंभू विभाग अध्यक्ष : एम के. बाबर (भाऊ),
सामाजिक कार्यकर्ते व तालुका उपाध्यक्ष : लालासो पाटील.
प्रशांत कदम टेंभू,
प्रवीणराव भुसारी,
शेतकरी संघटना नेते: पांडुरंग पाटील (नाना),
माजी तालुकाध्यक्ष : प्रवीणराव उथळे,
प्रदीप फल्ले, सामाजिक कार्यकर्त्या, सलमा फरास,
तरी सर्व शेतकऱ्यांनी संपर्क साधून, आपल्या आलेल्या नोटीस पत्रासहित भेटावे, संपूर्ण कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीसाठी- चलो सातारा, चलो सातारा, चलो सातारा, यावेळी कर्जमुक्ती व विज बिल मुक्ती झाल्याशिवाय यायचेच नाही, शंभर टक्के कर्ज व विज बिल मुक्ती मिळवायची, त्यासाठी त्या संपर्क साधावा. लाखोच्या संख्येने सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालय व वीज वितरण कंपनीकडे सहकुटुंब सहपरिवारासहित उपस्थित राहून कर्ज व विज बिल मुक्ती मिळवून भ्रष्टाचार व लूट थांबीवण्याकरिता
उपस्थित राहण्यासाठी अवहान करण्यात येत आहे.



