भारतीय पत्रकार संघाच्या वतीने अजितदादा पवार यांना !! भावपूर्ण श्रद्धांजली !! वाहण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानास बारामती विमानतळा जवळ भीषण अपघात झाला या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील कर्मचारी आणि वैमानिकासह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
फलटण : दि. 29 जाने 2026
दि. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी अजित दादा पवार मुंबईहून बारामतीसाठी चार्ट विमानाने निघाले होते बारामती विमानतळावर विमान उतरवत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान जवळच असलेल्या एका शेतात कोसळले हा अपघात इतका भीषण होता की त्यामुळे विमानाला आग लागली यातच अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व महाराष्ट्र राज्य एका कर्तुत्ववान नेत्याला गमावून बसले अजित दादा पवार दूरदृष्टी असणारे नेते होते त्यांना महाराष्ट्र राज्याचे लाडके झुंजार,निडर तडपदार,कर्तृत्ववान अभ्यासू कुशल नेतृत्व व विकास पुत्र अशी त्यांची कीर्ती होती दादा हे लोकांच्या हितासाठी रात्रंदिवस काम करणारे नेते होते अशा या आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार यांना भारतीय पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा व तालुका पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी भारतीय पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजकुमार काकडे , जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विकास शिंदे (सर ),जिल्हा हल्ला कृती समिती प्रमुख आप्पासो तांबे , तालुका सहसचिव गणेश भोईटे , तालुका संघटक प्रशांत सोनवणे , तालुका सदस्य जुबेर कोतवाल लोकशाही भारतचे संपादक सागर चव्हाण , शशिकांत भगत, अमोल शेलार हे उपस्थित होते.



