हसमुख व्यक्तिमत्व म्हणजेच बाळासाहेब काशीद….!!!

फलटण : तालुका प्रतिनिधी.
नंदकुमार मोरे यांनी सा.लोकध्यास च्या प्रतिनिधी जवळ पै. बाळासाहेब काशीद व त्यांच्या धर्मपत्नी बद्दलचे आपले व्यक्त केलेले मत
एक सुखी जोडी आपल्याला अकाली.सोडून गेली हि बातमी ऐकून खूप धक्का बसला शब्दांत सांगता येणार नाही असे हे दुःख आहे…!
पै. बाळासाहेब काशिद व वहिनी साहेब या माझ्या साठी एक मोठं साहित्य होतं.
रामायण, महाभारत, पौराणिक कथा , धर्म नीती व त्यांचा इतिहास, महापुरुषांचे आचार विचार , साधू संताचा एक सखोल अभ्यासक, खरोखरच बाळासाहेब यांचा ज्ञानाचा वारसा आणि अध्यात्मिक उंची असलेली हे असाधारण व्यक्तीमत्व होते , ते एक चालते बोलत ज्ञानकोश…!
पौराणिक कथा आणि भारतीय संस्कृतीचा एक गाढा अभ्यासक म्हणून मी व अनेक सहकारी मित्र त्यांच्या कडे पाहत होते.
अद्भुत असा हा कर्मयोगी…!
एक थोर अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला …!
अत्यंत दुर्दैवी..काळाचा घाला..!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि या कठीण काळात कुटुंबातील प्रत्येकाला ताकद देवो..!!
अशी संवेदना व्यक्त करतो…!!
नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन ..!!
## शोकाकुल ##
नंदकुमार मोरे फलटण
माझं फलटण… हरित फलटण…मी फलटण कर



